Ad will apear here
Next
‘राष्ट्रवादी’च्या जाहीरनामा समिती अध्यक्षपदी दिलीप वळसे-पाटील
मुंबई : ‘आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीरनामा समिती स्थापन केली असून या समितीच्या अध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची निवड करण्यात आली असून, या समितीमध्ये २२ सदस्यांची निवड करण्यात आली आहे,’ अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसने १४ जानेवारी २०१९ रोजी लोकसभेसाठी जाहिरनामा समितीची घोषणा केली आहे. या समितीमध्ये सदस्य म्हणून आमदार भास्कर जाधव, ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार राजेश टोपे, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, खासदार वंदना चव्हाण, आमदार विद्या चव्हाण, माजी आमदार जयदेव गायकवाड, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. विक्रम काळे, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, प्रदेश प्रवक्ते भूषण राऊत यांचा समावेश आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZQFBW
Similar Posts
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लोकसभेची पहिली यादी जाहीर मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची १२ जणांची पहिली यादी आज (१४ मार्च) प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
‘उमेदवार चाचपणीनंतरच योग्य निर्णय घेण्यात येईल’ मुंबई : ‘लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात समविचारी पक्षांशी आघाडी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिथे शक्ती आहे तिथे काम करण्यासाठी, जागा लढवण्यासाठीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि तिथल्या उमेदवारांच्याबाबतीत चाचपणी करण्यात आली आणि त्यावर भविष्यकाळात योग्य तो निर्णय घेतला जाईल,’
भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रचारसभा मुंबई : महाराष्ट्रात होत असलेल्या विधानपरिषदा आणि लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचारामध्ये जोरदार मुंसडी मारली असून, विधानपरिषदांच्या निवडणुकीनंतर आता भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रचारात आजपासून (ता. २२) उतरणार असून, त्यांच्या तोफा धडाडणार आहेत
‘समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणुका लढणार’ मुंबई : ‘काँग्रेस आणि समविचारी पक्षांशी चर्चा झाली असून, महाराष्ट्रात एकत्र निवडणुका लढवायचा निर्णय झाल्याने जागा वाटपामध्ये अडचण येणार नाही. मुंबईमध्ये एकत्र लढणार आहोत. त्यामुळे जास्त जागा मिळतील,’ अशी अपेक्षा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत बोलताना दिली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language